Saturday, 23 June 2018

पाऊस - एक कविता


पाऊस...

हल्ली थोडा उशिरा येणारा,
पण धरतीवर इमानाने बरसणारा...
स्वतः रंगहीन पण निसर्गावर 
मुक्तहस्ताने उधळण करणारा...
कधी गडगडाट कधी संततधार, तरी निष्पाप, 
आपलीच शक्ती न ओळखणारा...
दगड, बोटी, पिशव्या, घाण 
भेद न करता सगळ्यांना पोटात घेणारा...
धावणाऱ्या जगाची तारांबळ उडवून, 
त्यांना सक्तीची उसंत घ्यायला लावणारा...
कित्येकांच्या प्रेमाचा अंकुर फुलवून,
त्यांच्या एकांताचा साक्षीदार राहणारा...
शेतकऱ्याचा "बळी" नाही तर 
त्याला "राजा" बनवण्यासाठी धडपडणारा...

पाऊस...
जुन मध्ये सुरु होऊन सप्टेंबर मध्ये जाणारा, 
मनाच्या कोपऱ्यात आठवणीचा ओलावा ठेवणारा...


Friday, 1 June 2018

दाग अच्छे हैं..

४ दिवसा पूर्वीची गोष्ट. खास मे महिन्यातल्या आणलेल्या आंब्याचा रस खाताना एक थेंब माझ्या पांढऱ्या टी-शर्ट पडला आणि अगदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मन भूतकाळात गेलं. लहानपणी असंच मे महिन्यात घातल्या जाणाऱ्या पांढऱ्या सदऱ्यावर आंब्याचे डाग पडायचे. पण ते पडल्याशिवाय आंबा खाल्ला असं वाटायचंच नाही.

खरंच, शाळेत असताना कित्ती खास असायचा हा मे महिना आणि मे महिन्याची सुट्टी! सुट्टी खरं तर वार्षिक परीक्षा संपल्यावरच चालू व्हायची, फक्त मध्ये निकाल नावाचा एक सोपस्कार पार पाडावा लागायचा, पण त्याचं कधी टेन्शन आल्याचं आठवत नाही(अपवाद १० वी).   एक बरं, की त्या काळी उन्हाळी शिबिरांचं फॅड नव्हतं, म्हणजे असायची पण कधी घालायचं"च", असा ट्रेंड नव्हता. त्यामुळे आम्ही सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकलो.

आमचं सुट्टीचं टाइम टेबल एकदम मस्त असायचं - सकाळी ७वाजता(हो, हल्लीच्या मुलांसारखं १०-११ वाजेपर्यंत झोपणं आम्हाला कधी जमलंच नाही) उठायचं, आणि दात घासून चहा पिऊन झाला की खाली खेळायला जायचं -बॅटमिंटन, नेट ची कधी गरज नाही वाटली, दोन काठ्या आणि त्यावर दोरा बांधला की झालं नेट तयार! हे नऊ वाजेपर्यंत. मग घरी येऊन अंघोळ वगैरे करून परत १० वाजता खाली, तेव्हा क्रिकेट खेळायचं. खेळताना तहान लागली की पेप्सी कोला प्यायचो, पाण्याचा किंवा दुधाचा -२ प्रकार होते.  दुधाचा पिस्त्याचा पेप्सी कोला तर मस्तच लागायचा. १२वाजता जास्तच ऊन झालं की घरी जेवायला यायचं, मग गच्चीत पत्ते किंवा भेंड्या. संध्याकाळी ४ वाजता चहा झाला की परत ५ ला खाली ते ७.३० पर्यंत. आम्ही सोसायटी मध्ये मुलं पण खूप होतो त्यामुळे सगळ्यांचा कार्यक्रम असाच असायचा. संध्याकाळच्या खेळात व्हरायटी असायची-  क्रिकेट, सोनसाखळी, किंग किंग, गोट्या, डबा ऐस पैस, कबड्डी, खो खो, फुटबॉल, खपची, स्टॅच्यु, लपाछपी, डोंगराला आग लागली, कांदे फोडी....ऐकले पण नसतील ना हे खेळ,  पण आम्ही खेळलोय. मोबाईल नसल्यामुळे आम्हाला, सगळ्यांनी  एकत्र येऊन खेळायची चांगली सवय होती. आता  मुलं जेव्हा डोकं खाली घालून मोबाइल मध्ये गेम खेळताना दिसतात(कँडी क्रश,अँग्री बर्ड...), खूप अँग्री वाटतं आणि मोबाइल क्रश करावासा वाटतो. 

मोबाईल नसला तरी टीव्ही होता. पण तेव्हा आम्ही आहारी जाऊ एवढे कार्यक्रम नसायचे. सुट्टीत खास मेट्रो चॅनेल वर "फन टाइम" नावाचा दुपारी १२ ते १ मुलांचा कार्यक्रम असायचा, तो मात्र आम्ही आवर्जून बघायचो. त्यात कार्टून, पंचतंत्र वाल्या गोष्टी, असं बरंच काही असायचं.  जेव्हा विसिआर आले, तेव्हा पिक्चर बघायला लागलो व्हिडीओ कॅसेट आणून. मग क्वचित भाड्याने ६ / १२ तासासाठी प्लेअर आणायचा आणि लागोपाठ २ / ४(!)  चित्रपट बघायचे, आणि फक्त घरचेच नाही, तर शेजार पाजार चे सगळे मिळून!  स्वप्नवत च वाटतं  आता सगळं. 

टीव्ही वरून आठवलं, काही दिवसांपूर्वी जाहिरात पाहिली - "खाली डोकं वर पाय" नावाच्या लहान मुलांच्या पुस्तकाची. आत्ताच्या काळाच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे. आमच्या काळी आम्ही चंपक, ठकठक, चांदोबा किंवा कॉमिक बुक्स(मला फँटम आवडायचं) विकत घेऊन वाचायचो, त्यांची कधी जाहिरात व्हायची नाही, पण प्रसिद्ध असायची ही पुस्तक.

आमच्यातले काही सुट्टी निमित्त गावाला जायचे. आमचं गाव नसल्यामुळे मला मात्र त्यांचा खूप हेवा वाटायचा. पण नातेवाईक मात्र होते, काका-मामा-आत्या-मावशा यांच्या कडे ३ ते ४ दिवस राहायला जाणं हे ठरलेलं असायचं. किंवा आमच्याकडे कुणी यायचं. आता एक दिवस जरी कुणी राहायला आलं तरी रुटीन बिघडतं म्हणे.

छोटे छोटे आनंद होते - सकाळी फुलं वेचणे, दुपारी गच्चीत वाळवायला टाकणे, आईला रसना सरबत करायला मदत करणे, भाड्याने सायकल चालवणे, एक ना धड....कित्ती "युनिक" अनुभव होते सगळे या खास दिवसांचे.

आणि अशी मनसोक्त सुट्टी एन्जॉय करून आल्यानंतर शाळा चालू झाली की ही सगळी धम्माल वर्गमित्रांना सांगायची. मुख्य म्हणजे सुट्टीत खास ऐकून, लक्षात ठेवून दिलेले जोक्स. ते पुढे पंधरा दिवस संपेपर्यंत सांगायचे.

हे असं सगळं आठवलं त्या एका डागाने.  मग त्याला वाईट कसा म्हणू? आमच्या  पिढीचं हे नशीब की आम्ही हे सगळं अनुभवू शकलो. याच सगळ्यामुळे तर आम्ही घडलो! पण काळ आता बराच बदललाय, त्याचं तरी काय चूक. कधी कधी वाटतं, आपलीच पिढी चुकतेय की काय की आपण जे अनुभवलं त्याची गम्मत आपण पुढच्या पिढीला देऊ शकत नाही आहोत?  आजची मुलं त्यांच्या मोठेपणी त्यांचं बालपण चांगलं होतं अशी आठवण काढतील का? का  खरंच,  गेले ते दिन गेले?

Thursday, 29 March 2018

Choice or Chaos



"To be or not to be that is the question" it's one of the famous line written by Shakespeare.  Ever wondered why it is so famous for so many years? It indicates an ultimate battle with ourself that everyone has to face occasionally in our life.  What it means is that you have choices; you don't have to do something which someone else is telling you which we generally hate to do.  But even having a choice, it doesn't make our life easy, it leads to chaos. 

They say that our birth or death is not in our hands, it is decided by fate or god. There we don't seem to  have choice.

In life, we have to make choices at various stages.  As a kid, father or mother of the baby ask a typical question - "whom you like the most?" And the kid also replies something. Innocence at its best; whatever the answer is,  they both continue to love their kid.  But if the same question is asked in a family court by the judge where a kid has to choose the person, can u describe in words the state of kid's mind?

"Mera beta to doctor banega", "I want my daughter to become CA". Our parents always try to influence what we should become.  Perhaps it must be their innermost desire which they couldn't fulfill because of lack of choices.  In-spite of that, majority of them managed to do well, to stay in metro city raising their family.  Sometimes the lack of choice gets a better person out of you.  These days kids have lots of choices. Their selection starts from choosing the side after 10th - arts, science or commerce.  In each of these streams they have go on selecting specializations.  But these selections are never easy. Engineering or medical, in engineering whether it's computer or mechanical, plain commerce or  banking insurance etc. On top of that University has started implementing grading /choice based system.  But tell me frankly, has it made student's life simple?

After education, one important stage that everyone has to go through is marriage.  If you ask your parents how  they got married, many of them would have a same story. They got married to partners whom their family members decided.  Many of them also had to live in joint family satisfying the needs of more than 5 members in the family.  Inspite of differences of opinions, most of the marriages lasted for more than 25 yrs.  Today we live in much liberal world. Boys and girls have choice of selecting partners as per their ambition, education, financial level etc.  They also live separately from their parents.  But inspite of so much of freedom, why divorce cases have increased? Why current generation is failing to keep their partners happy? 

When I was a child, we all used to watch a single channel called Door-Darshan on TV.  Later on metro channel started.  We were quite happy and as a family used to watch lot of programs.  Now cable tv has  come into picture with more than 300 channels. But what has happened....Do we watch tv programs together?  I know in some families, there are two TVs because different members like to see different programs. My  parents were regular viewers of daily soaps and I had to put up a decent fight to watch a program of my choice if it's was coming in their way.  Finally as internet came in, i gave up knowing that apart from tv they don't have choice.  With smartphones and internet the situation has changed so drastically that now my dad  who used to watch daily soaps religiously, now watches youtube videos of his choice. 

When we used to go on picnic, we always uses to play Antakshari and it used to last the whole day.  In young generation, the problems are becoming more severe.  Recently I went to industrial visit with my students.  In bus, they started playing Antakshari.  But their enthusiasm lasted for 15 minutes.  After that they got bored as they couldn't enjoy each other's songs and soon engrossed into their own head phones. They didn't realize what they  were missing.  

What is causing these changes? Is availability of choices killing our ability to adjust with each other? So much so that we are getting disconnected from the people around us? And after selecting choices, are we happy? Are we becoming like that star whose own gravitional force becomes so strong that it finally destroys itself? 

Too much isn't it? Confusing or chaotic? You had a choice to read till the end...

Sunday, 4 March 2018

मायभाषा जणू माऊली..



वा! कित्ती छान वाटतंय मराठीतून लिहिताना!अगदी परदेशातून आपल्या देशात आलो की फक्कडसा आयता  चहा मिळाला की कसं  वाटतं तसं वाटतंय. तुम्हाला कितीही भाषा येत असल्या तरी मातृभाषा ती मातृभाषाच. अहो जन्मल्यावर बाळाला प्रथम आईची माया लागते आणि नंतर तिच्या भाषेची.   म्हणून म्हटलं, हा ब्लॉग मराठीतून लिहू या.  त्याला कारण पण तसंच आहे, नुकताच मराठी भाषा दिन साजरा केल्यामुळे त्याचा "हँग ओव्हर" म्हणा हवं तर.


२७ फेब्रुवारी हा प्रत्येक कॉलेजमध्ये..च् च् ... महाविद्यालयात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतात.  या निमित्त मराठी साहित्याची/जपणूक अथवा प्रसार केला जातो आणि ते मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. मी ही आमच्या महाविद्यालयातील मराठी मंडळाचा सभासद असल्यामुळे साहजिकच ही जबाबदारी आमच्यावर असते. तर सांगायचा मुद्दा हा की या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना मला माझ्यातला दडलेला कवी सापडला. अगदी "मै शायर तो नही" गण्यासारखं, फक्त हे प्रेम भाषेवरचं आहे. तर कवी कसा सापडला तर असा....

एक वर्ष आम्ही ठरवलं की आपण थोर कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर कार्यक्रम करू या. झालं, त्यांच्या कविता, बालगीते, गाणी सगळी तयारी सुरू झाली.  खरं सांगायचं तर मी काही त्यांचे फार कविता संग्रह वाचले नाही आहेत. पण त्यांच्या  खूप कविता,  गाणी माहिती आहेत आणि ऐकली आहेत. दुसरं प्रकर्षाने आठवणारी गोष्ट म्हणजे पहिला पाऊस पडला की न चुकता वर्तमानपत्रात छापून येणारी त्यांची कविता...ती सुद्धा त्यांच्या हस्ताक्षरात. त्यांची कविता सादर करण्याची शैली पण अफलातून होती. जस जसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येत गेला तस तसं मला वाटू लागलं की ज्या माणसाने आयुष्यभर कवितांवर प्रेम केलं, जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, त्यांना आपण एक कविताच अर्पण केली तर.  विचार पक्का झाला, पण कशावर लिहायची .., मुलांना उद्देशून लिहू या? पण काहीतरी विनोदी लिहू या आणि टपली मारू या. तर अशा तऱ्हेने सगळं सुचत गेलं आणि कविता लिहून झाली.  अरे हो, सांगतो माझी कविता....
तत्पूर्वी तुम्ही त्यांची मूळ कविता ऐका ज्याच्या वरून मी माझी कविता लिहिली -

https://youtu.be/T9vfn-Etmwo


धम्माल आली ना! आता माझी....शीर्षक आहे -

 "ह्यांचं असं का होतं कळत नाही" 

आजच्या कॉलेजच्या मुलांच जीवन 4G च्या वेगाने धावतंय,
तरी घोडं कुठेतरी अडतंय,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

सकाळच्या लेक्चरला नसतात कारण डोकं दुखत असतं,
दुपारच्या प्रॅक्टीकलला नसतात कारण पोट दुखत असतं,
मग परीक्षेचा पेपर लिहिताना कुंथतात, बाहेर काहीच पडत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

कपडे असे घालतात की घरचे सगळे हलतात,
केस असे भादरतात की ओळखीचे हादरतात,
आत्ता समोरून गेलेली व्यक्ती मुलगा होता की मुलगी हेही ओळखत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

नको त्या वयात प्रेमाचे झटके येतात कुणी  डेटला जातात कुणी प्रोपोझ मारतात,
कमिटमेंटचं स्पेलिंग सुद्धा चुकतं मग एफवाय चं सनम टिवाय पर्यंतही टिकत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

 आवाजापलीकडचं संगीत आणि धिंगाण्यापेक्षा वेगळा नाच यांना पचत नाही,
डॉल्बीआणि डीजे शिवाय तर ह्यांचं चालतच नाही,
शतदा प्रेम करावेतला आनंद चार बॉटल व्होडका च्या नशेपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे यांना उमगतच नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

ध्येय, प्रयत्न व सातत्य याशिवाय यश लाभत नाही,
मूल्य जपल्याशिवाय आणि समाधान मानल्याशिवाय शांती लाभत नाही,
मुलांनो, तुमच्या सेल्फीकडे नीट बघा, देवाचा अंश दिसेल,
दिसला तर त्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।
-----

माझ्या इतर सभासदांना ऐकवली तेव्हा ते म्हणाले कार्यक्रमात जरूर वाचा. कार्यक्रमात आम्ही आधी त्यांच्या या मूळ कवितेची चित्रफीत दाखवली आणि माहोल निर्माण झाला. मग मी माझी कविता भीतभीतच वाचली. आणि प्रेक्षकातून टाळ्या पडल्या.  अगदी "वन्स मोर" पण मिळालं, ते ही मुलाकडून!  पण मला मात्र मनोमन माहीत होतं की या टाळ्या खऱ्या मला नव्हत्याच, त्या पाडगावकरांना होत्या ज्यांनी लोकांना भरभरून दिलं आणि हा संदेश दिला -

"या जन्मावर, या  जगण्यावर, शतदा प्रेम करावे... "







Friday, 26 January 2018

What's in a name?




"What's in a name?" is a one of the famous lines written by William Shakespeare.  The point is whether we believe the line.  I mean, what if someone unknowingly says, "This line is written by William Wordsworth".  Will it change the idea?  And the funny part is - one who tries to rectify the mistake is actually going against the thought.   I feel that there are lot many things in a name.  For example - "My name is Bond....James Bond". This line appeared in first James Bond movie way back in 1962.  More than 50 years have passed but still the name has such an aura surrounding it and the fictional character that you start sensing the mystery and the action.  Now try saying the same line by putting your name.  Ok, I will use mine - "My name is Bhopatkar, Kamlakar Bhopatkar" Nah....sounds ridiculous isn't it?  

I have always struggled with  my name.  First of all it is too long.  Some people don't understand, that out of the two words, which one is first name and which one is surname as both end with "kar'.  If I have to tell/spell my name on phone to others, it takes a long time for them to understand.  While doing supervision, we are supposed to write name as well as sign on the answer books.  Some students become impatient when I try to do my duty.  My mom and dad are smart.  They kept "Kamlakar" as my official name and for family purpose, they assigned me a shorter name - "Rahul".  In family, everyone calls me "Rahul".  In school/college days, my friends used to abbreviate my name depending on their level of patience.  I tried telling them - "if you find my name to be longer, I have another name  Rahul, plz call me by that name".  But they used to say - "Rahul makes us think as if we are talking to a different person".  It made me realize how important your name is to identify you. Surprisingly, my surname is so unique that I have hardly come across another person with that surname.   Have you?

There are lot of things in the name.  First of all, it suggests your religion & caste - "Anthony", "Suresh", "Akbar".  Sometimes it may suggest where your ancestors belonged to - "Aurangabadkar", "Dadarkar", "Chemburkar".  Some names suggest profession - "Koli", "Sutar", "Kulkarni".   Names also identify gender - Sagar, Neha etc (except few such as Suman, Shirish, Sheetal etc).   People have names which resemble God's names or may be elements of nature.  There are theories of Astronomy/Numerology which also suggest/predict nature of a person from the name.  So just from a name, you come to know so much of information of a person!  Few people also have nick names like "Pintu", "Bacchu", "Chhutki" and they last even if they grow old.  But, a person whose name is going to identify him/her for the rest of life, doesn't get to choose it.  I don't know why women feel bad when they actually get a chance to change their name after their marriage. 

All moms & dads out there.... please give a good name to your son or daughter.  Don't just consider first name, consider full name.  Say that name couple of times, try telling it on phone & listen carefully how does it sound.  I mean "Rahul Lele", "Padmanabh Bhosle".  Same letters at the end of first name and start of the surname make full name bit odd.  Combination of letters with heavy pronunciation such as "Pa", "Bha", "Dha" etc in both names also make it harder.  Avoid use of similar letters - like "Ajit Dixit", "Pushkar Kashikar".  Consider "Pushkar Lele", "Ajay Bhosle" - would sound great.  One also needs to consider overall length of full name.  If surname is having more than 4 characters, then let first name contain 2 to 3 characters only.  And if surname contains 2 to 3 characters then let the first name contain 3 to 4 characters.  Names like - "Akash Fadtare", "Seema Bhanushali", "Padmakar Joshi", "Madhumita Roy" suggest a nice balance.  But - "RamaShankar Chourasia", "Jay Sen" are either too long or too short. 

The problems of names is not only this.  How to do you spell them in English also matters.  One major problem which I feel has happened in our system is the way we use single A in names.  For example - KAMLAKAR.  The spelling deviates too much from the pronunciation.  As per the pronunciation, the name should have been spelled as - KAMALAAKARA.  If we had kept consistent rules for use of A(Ajaya - अजय)/AA(Aakaasha - आकाश), I/EE(Raaginee - रागिणी), U(पुष्पा) /OO(पूजा), it would have solved great deal of problems to convert Indian languages to English language.   

In modern times, digital identity is so important.  If possible, parents can also create his/her mail(or any popular) id with name.surname style if its available. Your child would appreciate your foresight for the rest of his/her life.  Few celebrities create their personal website.  A time is not too far where majority of the people would like to create a website of their name.  In that case, while applying for birth certificate, people would be asked to create and reserve domain name for the child. 


Finally it's not just the name that matters, but what work you have done also matters a lot.  "Lata Mangeshkar", "Amitabh Bacchan", "Sachin Tendulkar" are not just THE names.  What they have achieved in their life by shear hard-work, dedication and consistency matters a lot.  Like them, our work should create our identity, not just our name.  Is bat pe ek sher yad aa gaya - 

खामोशी से बनाते रहिये पेहेचान अपनी,
हवाये खुद् गुनगुनायेगी आप का नाम \


Monday, 1 January 2018

Stack Overflow



It all started on 31st October 2017....the date on which I completed 40 years of my life..so to say half-life period if I had been a radium.  Yes, someone has predicted that I am going to die at the age of 77, wow!  It means I am not too late to start blogging unlike some of my students who became bloggers at their under-graduation level.

It's not that I am afraid of writing but I was not much fascinated to be present on social networking platforms.  Till date, I don't have any Facebook / Twitter account(what?) and I am doing OK with it!  I feel that -
You need to differentiate between facility and necessity 
When you go for foreign trips, people always say "Travel Light".  Life is also a journey, why can't we follow the same "mantra"? 

At 40, people expect you to be mature.   As if, you are 18 years old with 22 years experience!  Not too young but not too old.  You tend to  accumulate enough experience which people like to know.  The generation gap is still not big enough where it becomes difficult to get your thoughts cross the barrier.   And I happen to be in teaching profession!  Having fought on various fronts like - family, friends, career, marriage, house and many other things, having seen almost 15 generations/batches of students, lots of thoughts have been accumulated in my mind during the process.  Finally I decided that let them come out in the real world, sail through the sea of internet, fight their own battles. 

When you run a program on a computer that tries to occupy more memory than what is actually available, you get an error called - "Stack overflow".   Similar thing happened today with my mind.  So here I am, sitting on a cane swing with a laptop at a perfect place - balcony of the 7th floor.  I would like to be with you all through these blogs as they continue to appear.   That's enough for the first blog.  Hope you liked it.  Like Arnie (in case you don't know - Mr. Arnold Schwarzenegger) says in his famous one-liners - "Stick around..."

"I'll be back"!

मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...