पाऊस...
हल्ली थोडा उशिरा येणारा,
पण धरतीवर इमानाने बरसणारा...
पण धरतीवर इमानाने बरसणारा...
स्वतः रंगहीन पण निसर्गावर
मुक्तहस्ताने उधळण करणारा...
कधी गडगडाट कधी संततधार, तरी निष्पाप,
आपलीच शक्ती न ओळखणारा...
दगड, बोटी, पिशव्या, घाण
भेद न करता सगळ्यांना पोटात घेणारा...
धावणाऱ्या जगाची तारांबळ उडवून,
त्यांना सक्तीची उसंत घ्यायला लावणारा...
कित्येकांच्या प्रेमाचा अंकुर फुलवून,
त्यांच्या एकांताचा साक्षीदार राहणारा...
शेतकऱ्याचा "बळी" नाही तर
त्याला "राजा" बनवण्यासाठी धडपडणारा...
पाऊस...
जुन मध्ये सुरु होऊन सप्टेंबर मध्ये जाणारा,
मनाच्या कोपऱ्यात आठवणीचा ओलावा ठेवणारा...
No comments:
Post a Comment