Saturday, 23 February 2019

मराठीचा राखू मान हो जी जी जी...


आज बऱ्याच महिन्यांनी काहीतरी लिहितोय. निमित्त आहे २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिन!  मराठी भाषा जपली पाहिजे असं सर्वांना वाटतं पण आपण त्याच्या साठी काही मनापासून प्रयत्न करतो का हे स्वतःला विचारायला हवं. अहो, सुरुवात आपणच करायला हवी ना, दर वेळी इतरांकडून अपेक्षा करून कसं चालेल? असो. 

मी माझ्या महाविद्यालयाच्या मराठी मंडळाचा सदस्य असल्यामुळे आम्हाला वर्षभर काही ना काही काही करावं लागतं. अशाच एका कार्यक्रमाच्या वेळी घडलेला हा किस्सा. गेल्या वर्षी एका कार्यक्रमाच्या निवड चाचणीला आम्ही बरेच जण बसलो होतो.  बरीच मुलं त्यांना जे येतं ते सादर करून जात होती, त्यातून आम्हाला निवडायचचं होतं. एक गट आला आणि त्यांनी एक पोवाडा सादर केला. तो चांगला न झाल्यामुळे आम्हाला तो बाद करावा लागला.  पण प्रत्येकाच्या मनात ती खंत राहिली कारण पोवाडा सादर झाला असता तर खूप छान वाटलं असतं.  तुम्ही रॉकस्टार हिंदी चित्रपट पाहिला आहे का? त्यामध्ये काहीतरी असा एक प्रसंग आहे की कुणीतरी नायकाला सांगतं की चांगली निर्मिती तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला आतून दुःख होतं. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. ती जी खंत होती त्यामुळे मला असं वाटलं की आपण पोवाडा रचला तर?आणि देवाची कृपा की सुचत गेलं. जे सुचलं ते असं - 


मायभाषा जणू माऊली,
मनामध्ये भरली,
 वाणीवर सजली,
अक्षरातून नटली,
या मराठीचा राखू मान हो जी जी जी ।।


मुंबईत गाव चेंबूर,
हे गाव आहे लै न्यारं,
शाळा कॉलेज हो भरपूर,
हशुजींचं कार्य हे थोर, 
या कॉलेजला मुजरा करू हो जी जी जी ।।१।।


आला थंडीचा हंगाम, 
खेळांना चढला जोम,
मग टॅलेंशिया प्रोग्रॅम,
त्यात मराठीची रिमझिम,
(जमलेल्या प्रेक्षकांसाठी)
अशीच लाभो तुमची साथ हो जी जी जी ।। २।। 

(यूट्यूब व्हीडीओरिमझिम २०१७ मध्ये रचलेला पोवाडा)

तो पोवाडा त्या कार्यक्रमात सादर झाला. मी त्याला  तबला पण वाजवला. सराव कमी पडला नाहीतर अजून छान होऊ शकला असता. रिमझिम नावाचा हा कार्यक्रम आम्ही पावसाच्या मोसमात सादर करतो. काही अपरिहार्य कारणामुळे त्या वर्षी तो डिसेंबर महिन्यात केला गेला. आम्हाला वाटत होतं, डिसेंबर मध्ये रिमझिम कसं वाटेल.  पण गम्मत अशी की कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी रिमझिम पाऊस पडला! पावसाने  पण हजेरी लावून आमची लाज राखली!

तर सांगायचा मुद्दा हा की आपल्यातल्या प्रत्येकाला अशी मराठी बद्दल काहीतरी वाटलं पाहिजे.आणि फार काही करावं नाही लागणार.  वर्षातून एक-दोन मराठी पुस्तकं वाचावी, एक तरी मराठी नाटक/चित्रपट पाहावा किंवा भ्रमणध्वनी मध्ये मराठी  लिपी टाकून ठराविक लोकांना त्या लिपित संदेश लिहून पाठवावेत.


एवढं तरी करून बघू या, मराठी टिकवू या, मराठी वाढवू या !



मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...